किती सगळं शांत आहे
कुठे गेली सगळी घाई...
ऑफिस मधून घरी यायची
आता हळहळ मूळी उरली नाही...
जड झालंय पुढे पाहणं
कुठेय चाललोय कळत नाही...
पावलांना ह्या पुढे पाऊल
टाकायचे भान उरले नाही...
किती सगळं शांत आहे
कुठे गेली सगळी घाई...
भेडसावणारे वादळी विचार
आणि अश्रूंचाही पूर उरला नाही...
भटकत होतो आम्ही सगळे
तुझ्या हास्याचीच होती नवलाई...
जरी कधी वैतागलो सगळ्याला
तुझ्या मिठीत घ्यायचो तजेली अंगडाई...
किती सगळं शांत आहे
कुठेय गेली सगळी घाई...
स्वप्न आपली सगळी अडकून पडली
रोखून राहिलो आहोत आम्ही श्वास काही...
जीवनाच्या ह्या चक्राचा
बिंदूच जणू सापडत नाही...
आणि स्तब्ध अश्या ह्या अवस्थेत
तूझ्हीच आस लागून राहिली आहे आई..
किती सगळं शांत आहे
कुठे गेली सगळी घाई ......
.
कुठे गेली सगळी घाई...
ऑफिस मधून घरी यायची
आता हळहळ मूळी उरली नाही...
जड झालंय पुढे पाहणं
कुठेय चाललोय कळत नाही...
पावलांना ह्या पुढे पाऊल
टाकायचे भान उरले नाही...
किती सगळं शांत आहे
कुठे गेली सगळी घाई...
भेडसावणारे वादळी विचार
आणि अश्रूंचाही पूर उरला नाही...
भटकत होतो आम्ही सगळे
तुझ्या हास्याचीच होती नवलाई...
जरी कधी वैतागलो सगळ्याला
तुझ्या मिठीत घ्यायचो तजेली अंगडाई...
किती सगळं शांत आहे
कुठेय गेली सगळी घाई...
स्वप्न आपली सगळी अडकून पडली
रोखून राहिलो आहोत आम्ही श्वास काही...
जीवनाच्या ह्या चक्राचा
बिंदूच जणू सापडत नाही...
आणि स्तब्ध अश्या ह्या अवस्थेत
तूझ्हीच आस लागून राहिली आहे आई..
किती सगळं शांत आहे
कुठे गेली सगळी घाई ......
.
No comments:
Post a Comment