Tuesday, June 14, 2011

Paraka.. Stranger

परका ..


थकलेल्या पावलांनी काल घरी जात असता
तू हळुज थेंबा थेंबात साद घालत आलास
दर वेळी तू असाच अल्गद येतोस
पण ह्या वेळी जरा वेगळाच वाटलास


कोऱ्या रिकाम्या नजरेने तुला पाहत असता
तू नकळत माझ्यावर आपुलकीने  शिंपडलास
दर वेळी मी तुला कौतुकानी ओंजळीत साठवते
पण ह्या वेळी काय सांगू तू जरा परकाच वाटलास


क्षीणलेल्या श्वासाचा सुस्कारा सोडीत असता
तू मला चिंब ओला बिलगुनी राहिलास
दर वेळी ह्याचीच तर मी वात पाहत असते
पण ह्या वेळी तरी..का जणू अलिप्तच भासलास


खरं सांगते ह्या वेळी पावसा...
तू कुणाच ठाऊक का....
पण मला वेगळाच वाटलास....


A small rendition of my affair with the falling rains when the heart is already soaked in some listless feeling of love.

No comments:

Post a Comment