Sunday, February 20, 2011

Astitva..Existence

अस्तित्व
  
आला पाउस अंगणी
मन वेडे पिसे झले
त्या सख्याला भेटायला
पाय धावूनच गेले
  
रीम्झ्हीम्त्या त्याच्या सरीन्थ
अंग चिंब चिंब झाले
त्याच्या स्पर्चाच्या आठवनिन्थ
मन रोमांचात न्हाले
  
थेंब थेंब जैसा पडला
जीव बेधुंध हा झाला
प्रत्येक क्षणाला कसा तो
स्तब्ध रोखुनी राहिला
  
ओल्या चिंब ह्या देही
कापरा थंडीचा भरला
स्मरताच तुझ्हे ते ..श्वास
त्यांच्या उबेत तो हि गुदमरला
  
मी स्वताच मला
गच्च मिठीत घेतले
तरी देखील लाजेने
डोळ्यांचे पापणे चटकन मिटले


असे आहे रे तुझ्हे अस्तित्व
माझ्या कणाकणात वसलेले
तुझ्या वाचून कसे राहील रे
माझ्हे   जीवन  रंगलेले...

No comments:

Post a Comment